Sanvidhanach pustak hatat lyrics
मला बाई राती सपान पडलं
भारतरत्न भीमाच.
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
जणू काय इंग्लंड जर्मन चा राजा
तसाच भीमराव दिसतोय माझा -2
पायात बूट हाय
डोक्यात 🎩 हाय
युरोपियन दिसते सुटात
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
रथाच्या भोबती जमलाय तांडा
रथाला लावलाय निळाच झेंडा -2
निळे निळे लोक हाय
त्यात भीम एक हाय
कोट्यावधी गणगोतात
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
फुलांनी सजलाय चांदीचा रथ
चमचम करतोय वरुनी छत -2
चांदीचा रथ हाय
त्याला पण छत हाय
रथ हा शंकर लाखात
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
मला बाई राती सपान पडलं
भारतरत्न भीमाच.
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
savidhanach pustak hatat bhimrao lyrics in marathi
Song information
Album : Bhim Yugandhar
Singer: Anushka Shiktode
Music Director: Prabhakar Pokharikar
LYRICS: Shankar Kamble
Producer: Ashatai Shantaram Shinde
0 Comments